Sunday, May 24, 2020

Need of social distancing

गरज social distancing ची

प्राण्यांना शिकारीपासुन 
निसर्गाला प्रदुषणापासुन
गरज social distancing ची

झांडाना कत्तलीपासुन
पाण्याला दुर्गंधीपासुन
गरज social distancing ची

रस्त्याना खड्ड्यापासुन
सुखाला दुखाःपासून
गरज social distancing ची

वागण्यातल्या वाईटापासुन
घरांना शेजार्यापासुन
गरज social distancing ची

मैत्रीतल्या दुराव्यापासुन
प्रेमाच्या आसक्तिपासुन
गरज social distancing ची

नियतीला प्रकृतीपासुन
जगाला संकटापासुन
गरज social distancing ची

जगण्याला मरण्यापासुन
भविष्याला भुतकाळापासुन
गरज social distancing ची

माणसाला माणसापासून
जगाला कोरोनापासुन
गरज social distancing ची





No comments:

Post a Comment